नंदुरबारकरांची चिंता वाढली, मृत वराहांच्या अहवालानंतर उपाययोजनाचे आदेश

नंदुरबार : ‘स्वाइन फ्लू’ने नंदुरबारकरांची चिंता वाढवली आहे. आता आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

आष्टे (ता. नंदुरबार) येथील क्षेत्र अफ्रिकन स्वाईन फिवर बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथील वराहांच्या मृत्यूनंतर नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले होते. तेथून अहवालाअंती वराहांना आफ्रिकन स्वाईन फिवर झाल्याचे कळविण्यात आलेले आहे.

हा रोग जलदगतीने पसरणारा अधिसूचित रोग असल्याने जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आष्टे गाव व परिसर बाधित क्षेत्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारींनी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये आष्टे येथील एक कि.मी. परिघातील भागास बाधित क्षेत्र घोषित केले आहे.

तसेच १० कि. मी. परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र संबोधित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संबंधीत विभागांनी मार्गदर्शक सुचनेनूसार उपयायोजनेचे आदेश दिले आहेत.

स्वाईन फ्लू कशामुळे होतो ?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो.

जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो.

स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.