सागर निकवाडे
नंदुरबार : भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र, काश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क सातपुड्यात शेती केली जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हर्ष पाटील या तरुणाने हा भन्नाट प्रयोग केला आहे. यात आणखी विशेष म्हणजे ही केशरची शेती त्याने चक्क घरालगत असलेल्या 15 बाय 15 च्या खोलीत केली आहे. आता हर्षच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
केशर हे तोळ्यावर विकले जाते. केशरचे महत्त्व भारतीय अन्न पदार्थात मोलाचे स्थान आहे. प्रतिग्रॅम ३०० ते १५०० रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. त्याच्या दर्जानुसार केशरचा भाव आपल्याला बाजारात पहायला मिळतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त ३ ते ४ टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून हर्ष पाटील यांनी हा हाऊस फार्मिंगचा प्रयोग सातपुड्यात राबवला असून तो यशस्वी देखील केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या खेडदिगर (ता.तळोदा/शहादा) या छोट्या खेड्यातील हर्ष पाटील या तरुणाने हा प्रयोग यशस्वी केला आहे. हर्ष पाटील हा तरुण कॉम्प्युटर पदवीच्या चौथ्या वर्षी शिक्षण घेत आहेत. त्याने काश्मीरमध्ये केशरच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत असल्याची माहिती तंत्रज्ञानाद्वारे घेतली आणि केशर उत्पन्न घेण्याच्या मानस ठरवला.
काश्मीर येथील मोगरा जातीचा केसरच्या फ्लोअर कंद लावून केशर शेती सुरू केली. काश्मीरमधील श्रीनगर लगत असलेल्या पॅमपूर येथून एक हजार रुपये किलो किमतीने मोगरा जातीचा कंद आणून घरालगत असलेल्या 15 बाय 15 च्या रूम मध्ये त्याची सुरुवात केली. या रूमला पूर्णता थर्माकोलने चिटकवून त्या रूममध्ये थंड वातानुकूलीत रुम बनवले.
चोवीस तास वातावरुकूलित रूम असतं. एक सिड कंद लावल्या नंतर तीन महिण्यात त्यातून तीन-चार केसर निघते. एक सिड कंदची आठ ते दहा वर्षे पर्यंत उत्पन्न मिळते हळुहळु एक सिडचे चार सिड तयार होते.
डीच ते तीन महिने लागवड करून झाले आहे. साधारण पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. सिडला फुल बहारत आहे एका फुल मध्ये तीन केसर बाहेर निघत आहे. केसरचे उत्पादन सुरू झाले आहेत. 300 ग्रॅम पर्यंत उत्पादनाची शक्यत आहे. बाजारात एक ग्रॅम केसरचा भाव 500 रूपये असल्याचे हर्ष पाटील यांनी सांगितले.