नंदुरबार : डी.जी.रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मराठी वाड्मय आयोजित मराठी भाषिक पंधरवडा निमित्ताने “वारसा-२०२४” उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी २३ व २४ असे दोन दिवस विविध स्पर्धां घेण्यात आल्या. त्यापैकी “ताल धरू बोली संगे-लोकनृत्य स्पर्धा” या प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मराठी विभागाचे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यात मराठी विभागाचे यश तावडे,दिपक पवार,वृषाली ढेरे, श्रुती भागवत,गायत्री साने,दिपाली भाटाटे,श्रद्धा चांदगुडे,श्रावणी देवकर,प्रतिक कदम,शर्मिला देवकाते,दीक्षांत पवार,कुणाल नाईक,हृतिक परब,समाधान चांदगुडे,सुयश भुरे पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक, अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा.डाॅ.नागनाथ बळते, प्रा.डॉ.कुंडलिक पारधी यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन व दिग्दर्शन दीपक पवार यांनी केले होते.