नंदुरबारमधील ‘त्या’ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश

नंदुरबार :  शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत गुन्हे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भागसरी गावात जावून संशयीत आरोपी रंजित अमर भिल वय- 35 , श्रीनाथ सुकलाल भिल वय- 26 , सागर रविंद्र भिल वय-22 , कृष्णा प्रल्हाद भिल वय-26 सर्व रा. भागसरी ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना धामडोद येथील शेतातून चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटर त्यांच्या ताब्यातून 98 हजार रुपये किमतीच्या 07 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

त्याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं 350/2023 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे दाखल आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितेश प्रविण ठाकरे वय-22 रा. खामगांव ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून सदरची चोरी त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केली असल्याची माहिती दिल्याने मच्छींद्र अनिल भिल वय-22 राहुल विनोद पाडवी सर्व रा. खामगांव ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 56 हजार रुपये किमतीचा 08 क्विंटल कापुस हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे खुर्द गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून 300 लीटर ऑईलचोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे गोपाल कैलास राजपुत वय-27 रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार , मोतीलाल लक्ष्मण माळी वय-22 रा. इंद्राहटटी् ता.जि. नंदुरबार , रोहित प्रभाकर धनगर वय-20 रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार यांना देखील ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुझलॉन टॉवरमधून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.