नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; के.सी. पाडवींच्या निष्ठावंत कार्यकत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !

 

नंदुरबार – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मेळाव्यात कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदचे गटनेते तसेच माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांचे निष्ठावंत कार्यकत्या रतन पाडवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

नंदुरबार येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मेळाव्यात कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदचे गटनेते तसेच माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांचे निष्ठावंत कार्यकत्या रतन पाडवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष मोहन शेवाळे, धुळे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रदेश सदस्य निखिल तुरखिया,ज्ञानेश्‍वर भामरे, किरण शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, रतन पाडवी, मधुकर पाटील, मोहन माळी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील प्रश्‍न, कार्यकर्त्यांचा अडचणी यासह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धडगाव व तळोदा विधानसभा मतदार संघातील उमेदवारीची मागणीसह विविध विकास कामे मार्गी लावण्यासोबत जिल्ह्यातील पक्ष संघटनाची माहिती मांडली. तसेच प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनीही युवक कॉंग्रेसचे कार्य व त्या माध्यमातून पक्ष संघटनाची दिशा बाबत रूपरेषा मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी रोखठोक बोलतो, या स्वभवामुळेच जनता माझ्या पाठीशी राहते, काही थोडे फार घाबरतात, मात्र घाबरण्याचे काहीही काम नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडायचे नाही, सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांचा पाऊलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस आदिवासी,दलित,मागासवर्गीय, बहूजनांचा विकासासाठी काम करतो आहोत,महिलांना मान -सन्मान, आदर, सुरक्षितता मिळाली पाहिजे,सर्वांचा विचाराने महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहे. महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. तसेच पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अलिकडे आम्ही जी भूमिका घेतली ती केवळ जनतेचे कामे व्हावे म्हणून. आदिवासी, दलित,बदूजन समाजाला एकत्रित आणून त्यांचा विकास व या महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय समोर आहे.त्यामुळे सत्तेत सहभागी होऊन सर्व विभागाला व घटकांना प्रतिनिधीत्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कालचा केंद्रीय अर्थ संकल्पात निर्मला सिताराम यांनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. शेतकरी, बेरोजगारांचा विकास ,त्यांना रोजगार देण्याचे काम केले जाणार आहे. आदिवासी विभागाचा बजेटमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याने आपण पुरवणी मागण्यांमध्ये अडीच -तीन हजार कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे.तापीवर सुलवाडे,प्रकाशा सिंचन प्रक्लप उभारले, लिप्ट अडचणीत आल्या. उपसासिंचन असेल यासाठीही प्रयत्न केले आहेत.