नंदुरबार : दिव्यांग कलाकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी चेतना मेलडी ऑर्केस्टाचे नुकतेच आयोजन करण्यात आले .
यात तात्या पानपाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व प्रथम शोले पिक्चरच्या गाजलेल्या म्युझिकने कार्यक्रमांची सुरवात झाली. कार्यक्रमाचे उदघाटण महिला सक्षमिकरणाच्या कार्यकर्त्यां सुलभा महिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रा. देवरे , प्रकाश मांडलिया ,सागर हॉटेल चे संचालक बाबला मांडलिया, शामराव बेडसे, डॉ समिधा नटावदकर, रावसाहेब कांबळे, शामकांता बेडसे, प्रकाश मछले, मनोज भंसाली आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात देशभक्ती, सामाजिक तसेंच रोमँटिक गाणे गायनात आले .
कार्यक्रमाला डी आर शाळेची जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल श्रीराम मोडक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी रसिकाना मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकारात चंद्रकांत मैलागीरे, सुनीता पांचाळ, निर्मला शिरसाठ, दुर्गा गवई, प्रवीण पाटील, विनय वाघ, कमलाकर प्रजापती यांनी भन्नाट कलागुणांनी आपली कला साजरी केली. सूत्रसंचालन आयोजक तात्या पानपाटील यांनी केले.