नंदुरबारला राहुल गांधी म्हणाले, “आदिवासी हे देशाचे खरे मालक”

नंदुरबार : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रातील नंदुरबार येथे पोहोचले आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी  देशाचे खरे मालक हे आदिवासी आहेत. देशात जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आदिवासी देशात होते. जंगल, जल, जमीन याचे खरे तुम्ही मालक आहात, असे म्हटले.

दरम्यान, राहुल गांधी यांची यात्रा नंदुबारमध्ये येताच बड्या नेत्याने साथ सोडल्याने काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. उद्या ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.