---Advertisement---

नंदुरबारातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

---Advertisement---

नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे १० फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आरीफ कमर शेखसह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सर्वांना राष्ट्रवादीचे रुमाल देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल भाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कुषी मंत्री धनंजय मुंडे, क्रिडामंत्री संजय बनसोडे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मुंबई अध्यक्ष पंकज भुजबळ, अल्पसंखाक राष्ट्रीय अध्यक्ष अँड जलालोदिन सैय्यद प्रदेश अध्यक्ष इलियास नाईकवाडी, राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व नगरसेवक सेवक खलील खाटीकसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment