---Advertisement---

नंदुरबारात आज बावनकुळे; होणार महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

---Advertisement---

नंदुरबार : महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज २ रोजी भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. श्री बावनकुळे यांच्या उपस्थीतीत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामकाजी बैठक होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेग आला असुन सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु आहे. महायुतीसह एनडीए घटक पक्षांचे नेते प्रचाराला निघाले आहेत. श्री बावनकुळे यांच्या उपस्थीतीत नंदुरबार जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठक ही केवळ कामकाजी असून यात मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आली आहे. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आ.राजेश पाडवी, आ.काशीराम पावरा यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थीत राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---