वैभव करवंदकर
नंदुरबार : शहारातील श्री. क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी नगरपालिका वैशिष्टपुर्ण विकास योजनेतंर्गत एक कोटी निधीला मंजुरी मिळाली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, महासंसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर निधी मंजूर झाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार, शहादा व शिरपुर तालुक्यातील विविध विकास कामाना नगरपालिका वैशिष्टपुर्ण विकास योजना सन 2023-24 अंतर्गत 10.00 कोटी रु. निधी मंजुर झाला आहे. त्यामध्ये नंदुरबार शहरातील सुर्यवंशी क्षत्रीय मराठा समाज येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी 2.00 कोटी रु. निधी मंजुर केला आहे. तसेच कासार समाज, नंदुरबार येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी 1.5 कोटी निधी मंजुर केला आहे. तसेच समस्त भावसार पंच, नंदुरबार येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामास 1.5 कोटी निधी मंजुर केला आहे. तसेच श्री. क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ, नंदुरबार येथे मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी 1.00 कोटी निधी मंजुरी केला आहे.
शहादा शहारातील भोई समाज, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामास 2.00 कोटी रु. निधी मंजुर केला आहे. तसेच अहिर सुवर्णकार समाज मंडळ, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी 1.00 कोटी रु. निधी मंजुर केला आहे. तसेच शिरपुर शहारातील रातील जैन समाज, शिरपुर ता. शिरपुर जि. धुळे येथे समाज भवनाचे बांधकाम करण्याच्या कामासाठी 1.00 कोटी रु. निधी मंजुर केला आहे.
विविध विकास कामांना नगरपालिका वैशिष्टपुर्ण विकास योजना सन 2023-24 अंतर्गत 10.00 कोटी रु. निधी मंजुर झालाबद्दल समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक समाजातील अध्यक्ष व समाज बांधव ना. डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हिना गावित यांनी केलेल्या कामाबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती एकमेकाला शुभेच्छा देताना दिसत आहे.