नंदुरबारात धीरज साहू यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

 

नंदुरबार : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी येथे भाजपतर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शानुताई वळवी, भाजपा महामंत्री सुदानंद रघुवंशी, जिल्हा महामंत्री सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष माणिक माळी, काजल मछले, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सरिता चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोशनी राजपूत, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील, दिव्या जोशी, वैशाली राठोड, प्राची सोनवणे, सरिता चौधरी, आशाबाई पाडवी, ताई वळवी उषाबाई वळवी, निनाबाई वळवी आदी महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.