नंदुरबार : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून, यात सर्वाधिक ९ जागा भाजपकडे गेल्या आहेत. तर, ७ अपक्षाला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या मतमोजणी पूर्ण झाली असून शहादा तालुक्यात भाजपाच्या वर्चस्व राहिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत.
१६ पैकी भाजपाला ९ ग्रामपंचायतीवर यश आले आहे. तर ७ जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. शहादा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र अनेक प्रस्थापितांना धक्का देत अपक्षांनी मोठी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.