शहादा : वडिलांसोबत शेतात गेलेल्या लवकुश पावरा (९ ) याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना चिखली बु येथे घडली. या घटनेत लवकुश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहादा तालुक्यातील कुसूमवाडा परिसरात गेल्या महिन्या पासून बिबटयाने धुमाकूळ घातला आहे. परिसरात बकऱ्या हल्ला करून फस्त केल्या मात्र, आता माणसावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कुसुमवाडा येथे एका उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहे. मात्र तो पकडला गेला नाही. अशातच १८ रोजी चिखली पुनर्वसन येथील एका लहान बालकांवर हल्ला करून जखमी केले.
जखमी मुलगा लवकुश हा वडिलांसोबत शेतात गेला असता बिबट्याने हल्ला केला. वडिल बारक्या पावरा यांनी आरडा ओरड केल्याने मुलाला सोडवण्यात यश आले. बिबट्याच्या हल्ल्यात लवकुशगंभी जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर बारक्या पावरा यास मांडीवर तीन दात गाडले आहे. त्याच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालत असून वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.