छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. काँग्रेस नेते जोगा पोडियम यांची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. 10 यापूर्वी नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याच्या मुलाला जिवंत जाळले होते. आता वडिलांचाही खून झाला. काँग्रेस नेते जोगा पोडियम यांना बऱ्याच दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून धमक्या येत होत्या. ज्या गावात ही घटना घडली ते गाव सीआयएफ कॅम्पपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दंतेवाडातील अरनपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. शुक्रवारी रात्री जोगा पोडियाम हे आपल्या कुटूंबासोबत जेवण करून पोताली गावात विश्रांती घेत होते. यावेळी काही नक्षलवादी त्याच्या घरी पोहोचले. सर्वजण साध्या वेशात होते. नक्षलवाद्यांनी दरवाजा ठोठावला आणि जोगा यांना बाहेर काढले आणि नंतर धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.
खून केल्यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या खळबळजनक घटनेची माहिती सकाळी दंतेवाडा पोलिसांना मिळाली. अरणपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाजवळ पोलिसांना एकही नक्षलवादी पत्रिका सापडली नाही. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.