नगरदेवळ्यात वैशाली सुर्यवंशी यांचा झंझावात; एकाच दिवशी १२ शाखांचे उदघाटन

 

नगरदेवळा, ता. पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत सर्वसामान्यांशी संवाद साधणार्‍या शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचे येथे स्वागत करण्यात आले. एकाच दिवशी येथे १२ शाखांचे उदघाटन करण्यात आले असून या माध्यमातून तरूणाईची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसून आले आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महा संपर्क अभियान सुरू केले असून याला समाजाच्या सर्व स्तरांमधून अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. या अनुषंगाने शुक्रवारी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे वैशाली सूर्यवंशी यांचा दौरा पार पडला. यात त्यांनी १२ शाखांचे उदघाटन करतानाच ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधला.

प्रत्येक शाखेच्या ठिकाणी ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये वैशाली सुर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शिवसेना शाखेचे उदघाटन आणि फलक अनावरण करण्यात आले. जनसामान्यांच्या सेवेचा विडा उचलतांनाच आपल्या वडिलांचा जनसेवेचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आपल्या दाराशी आलो आहोत. आपण तात्यासाहेबांवर जितके प्रेम केले, त्यांच्यावर जितका विश्‍वास टाकला ते सर्वांनी पाहिलेले आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठीच आपण राजकीय मैदानात उडी घेतली असून आपण या लढ्यात निश्‍चीतच माझ्या सोबत राहणार, असे प्रतिपादन वैशाली सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले.

नगरदेवळा येथे ठिकठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांचे औक्षण करण्यात आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. लक्षणीय बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजाच्या परिसरात देखील मोठ्या जनसमुदायाने त्यांचे जल्लोषात स्वागत करत वैशाली सुर्यवंशी नमस्कार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांच्यासह पक्षाचे उद्धव मराठे जिला उपप्रमुख तालुकाप्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजीव काळे, पप्पू राजपूत, पांडुरंग दादा, लक्ष्मण रोकडे, नाना सोनार विनोद राऊळ, बाळू अण्णा हरिभाऊ, अशोक चौधरी, सुरेश चौधरी, मिलिंद दुसाने, अनु शेख, दत्तू भोई, योगेश समारे, मनोज गुंजाळ, विकी महाजन, मुकेश राजपूत, जिभाऊ गुंजाळ, सोमनाथ महाजन, रवी महाजन, राजू लोहार छोटू लोहार, बबलू पाटील, बबलू अण्णा, धर्मराज पाटील, शिवा ठाकूर, सचिन राजपूत, बापू परदेशी, भैय्या पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण सोमवंशी बापू सोमवंशी दिलीप नाना, बाळू प्रकाश मोरे, संदीप जैन, भूपेश सोमवंशी, मनोज चौधरी, गफार भाई, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल यांच्यासह समस्त ग्रामस्थ व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.