---Advertisement---

नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह आढळला

---Advertisement---

धुळे : साक्री तालुक्यातील अष्टाने येथील कान नदीत वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह बुधवारी कावठी गावाजवळ आढळला.

दोन दिवसांपूर्वी नदीच्या पात्रात चार जण वाहून गेले होते, पैकी तिघांना वाचवण्यात यश आले होते. अष्टाने येथील विजापूरकडे जाणाऱ्या सकाळी पुलावरून मंगळवारी दहाच्या सुमारास गोजराबाई देवा गायकर, सीताराम काशीराम सुळ, गोजराबाई सीताराम सुळ, देवा काळू गोयकर (सर्व रा. छडवेल ता. साक्री) हे विजापूरकडून अष्टाणेकडे जाणाऱ्या पुलावरून वाहून गेले होते.

त्यापैकी सीताराम काशीराम सुळ, गोजराबाई सीताराम सुळ, देवा काळू गोयकर ह्या तिघांना वाचविण्यात यश आले होते. तर गोजराबाई गोयकर या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी कावठी गावाजवळ आढळला आला. याप्रकरणी साक्री पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment