जळगाव | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार असून त्यांच्यासोबत काही खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यासाठी शपथ घेणाऱ्या खासदारांना दिल्लीतून फोन केले जात असून यात रावेरच्या नवनिर्वाचीत खासदार रक्षा खडसे यांना देखील फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील एकमेव महिला नेत्या म्हणुन विजयाची हॅटट्रीक करत रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील धोबपछाड देत विजयी झाल्या लागोपाठ तिसर्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
ओबीसी वर्गातून असल्याने त्यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता होती. त्यानुसार आज खडसे शपथ घेणार असल्याचे माहिती मिळत आहे. यामुळे अनेक वर्षाच्या कालखंडानंतर जळगाव जिल्ह्यातील खासदाराला केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?
दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज ते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर आज सकाळी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. तसेच भाजपच्या खासदार रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी, यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.