तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। महिलांवरील अन्याय आणि अत्याचारा च्या विरोधात लढा देणाऱ्या आणि सध्या कारागृहात असेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. इराणमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध दिलेला लढा आणि मानवाधिकारांसाठी केलेले अतुलनीय काम यासाठी नर्गिस मोहमदी यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय नोबेल निवड समितीने घेतला.
२०१९ मध्ये हिसंक आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या स्मृती कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल नर्गिस यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या कारागृहात आहेत. विशेष म्हणजे नर्गिस यांचा आयुष्यातील बराच कारागृहात आहेत. इराण सरकारने त्यांना आतापर्यंत १३ वेळा अटक केली. २०१९ मध्ये कारागृहात डांबण्यापूर्वी त्या इराणमध्ये असलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरच्या उपाध्यक्ष होत्या.