नवरात्रीचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असणार आनंदाचा

तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील.

वृषभ रास 
आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापार व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. संततीकडून शुभवार्ता समजतील.

मिथुन रास 
व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. दैवी पाठबळ लाभणार नाही. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत, अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. वाहन घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल.

कर्क रास 
नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल.  प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, या विषयी काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल.

सिंह रास 
नोकरीत गैरसमजाचे वातावरण राहील. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

कन्या रास 
आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील. आज मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल.

तूळ रास 
नोकरीत बढतीची शक्यता राहील. राजकारणात किंवा समाज कारणात आपली प्रतिष्ठा ढासळ्याची शक्यता आहे. पत्नी-संततीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास 
नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहील.

धनु रास 
पती-पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खूप मेहनत घ्यावी लागेल.  जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल. आर्थिक प्रकरणात नुकसान होऊ शकते.

मकर रास 
आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

कुंभ रास 
बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल.

मीन रास 
बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. गूढशास्त्राकडे कल राहिल. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.