नवरात्रीपूर्वीच्या आठवडाभरात सोने १५०० रुपये; चांदी २३०० रुपयांनी महागली

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। नवरात्री आधीच्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोने सुमारे १५०० रुपयांनी तर चांदी २३०० रुपयांनी महागली आहे. २४ कॅरेट सोने गेल्या आठवड्यात शुक्रवारी ५६ हजार ५३९ रुपये होते. या आठवड्यात शुक्रवारी ५८ हजार ३२ रुपये प्रतिदहा ग्रॅम झाले.

या काळात चांदीची किंमत ६७ हजार ९५ रुपयांवर ६९ हजार ४०४ रुपये प्रति किलो झाली. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात होण्याच्या दरातही सात महिन्यातील सर्वात मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव सुमारे तीन टक्के वाढ होऊन १,८८६.४० सुमारे ५५,३८५ प्रती दहा ग्राम वर पोहोचला. नवरात्रीतील शुभमुहूर्तांमुळे सोने चांदीच्या खरेदीत वाढ होईल.

या आठवड्यात सोन्यावरील प्रीमियम प्रति दहा ग्रॅम व चांदीवर सुमारे एक हजार रुपये प्रति किलोने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजरासह देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमतीतील वाढ कायम राहू शकते.  आंतरराष्ट्रीय बाजारात उत्पन्न कमी व डॉलर कमवत होत आहेत. यामुळे सोन्याला आधार मिळत राहील. दरम्यान भारतीय बाजारपेठे सणासुदीला मागणी वाढणार आहे. यानंतर लग्नाचा हंगाम राहील अशावेळी मागणी वाढल्याने किमतींवर परिणाम होईल.