तरुण भारत लाईव्ह | भुसावळ – गणेश वाघ : अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीसह आपल्या जन्मदात्या आईचाच रेल्वे कर्मचार्याने कौटुंबिक वादातून खून केल्याची घटना शहरातील शगुन इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे घडली. दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. आराध्या हेमंत भूषण (23) व सुशीलादेवी भूषण (63) अशी मयतांची नावे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तथा रेल्वे कर्मचारी हेमंत श्रवणकुमार भूषण यास अटक करण्यात आली आहे
डोक्यात मारली धारदार वस्तू
संशयित आरो हेमंत भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ कर्मचारी असून पत्नी व आईसह तो वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये वास्तव्यास आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून पत्नी आवडत नसल्याने त्याचे मंगळवारी मध्यरात्री भांडण झाले व आईने वादात मध्यस्थी केल्याने त्याने 63 वर्षीय आईचा तसेच 24 वर्षीय पत्नीचा डोक्यात लोखंडी वस्तू मारून निर्घृण खून केला. हा प्रकार पाहून सुरक्षा रक्षक असलेला शालक सरसावला मात्र त्याच्यावरही मेहुण्याने हल्ला केल्याने तो रक्तबंबाळ झाला. जखमी शालकाने बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली.
पोलीस अधिकार्यांची धाव
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.