नवीन संसद भवन : पहिल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित केले. ही नवी वास्तू आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नवे पॅटर्न नव्या वाटांवर चालल्यानेच निर्माण होतात. आज नवा भारत नवीन ध्येय निश्चित करत आहे. प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे अजरामर होतात. 28 मे हा असा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली. या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, नवीन संसद भवनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

नवी संसद आत्मनिर्भर भारताची साक्ष देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यातून भारताच्या निर्धाराचा संदेश जगाला मिळतो. संसद आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवे संसद भवन नियोजनाला वास्तवाशी, धोरणाला बांधकामाशी, इच्छाशक्तीशी कृतीशक्तीशी, संकल्पाला यशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.

ही नवीन इमारत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माध्यम बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नव्या-जुन्याच्या सहजीवनासाठीही ही नवी इमारत आदर्श ठरणार आहे. ते म्हणाले की जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासातून जगाच्या विकासाची हाक देईल. नव्या वाटांवर चालल्यानेच नवे आदर्श निर्माण होतात, असे ते म्हणाले. आज नवा भारत नवीन मार्ग तयार करत आहे आणि नवीन ध्येये निश्चित करत आहे.

आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे – पंतप्रधान मोदी
आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे, आपली राज्यघटना आपला संकल्प आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपली संस्कृती आपल्याला शिकवते की चारैवेती चरैवेती, म्हणजेच चालत राहा, चालत राहा कारण तुम्ही थांबलात तर तुमचे नशीब थांबते. 21 व्या शतकातील नव्या भारताने गुलामगिरीचा विचार मागे टाकला आहे. संसदेची ही नवीन इमारत याच प्रयत्नाचे जिवंत प्रतीक बनली आहे.