नागपुरातून मोठी बातमी! कंपनीमधील भीषण स्फोटात 9 जण ठार

नागपूर : महाराष्ट्रातील नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करत असताना हा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की, ‘नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग दरम्यान हा स्फोट झाला. असं त्यांनी सांगितले आहे