नागपूर – प्राथमिक चौकशीमध्ये ‘सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोणताही घातपात आढळत नाही. स्फोटाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे ‘सीसीटिव्ही फुटेज’ उपलब्ध झाले आहे. घटनास्थळावरून ‘फॉरेन्सिक’ नमुना घेण्यात आले आहेत; मात्र ‘फॉरेन्सिक’च्या अंतिम अहवालानंतरचया दुर्घटनेत घातपात आहे कि नाही, हे निश्चित होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
संरक्षण विभागाकरता लागणार्या विस्फोटकांचे उत्पादन या आस्थापनात केले जाते. या आस्थापनामध्ये ३ हजार ४०० कामगार आहेत. ‘टी.एन्.टी. आणि ‘आर्डीएक्स’द्वारे कच्च्या मालापासून ‘हॅन्डग्रेनेट’साठीच्या ‘पॅनेट’ची निर्मिती येथे केली जाते. यासाठी ‘टी.एन्.टी. फ्लेस’ चाळत असतांना हा स्फोट झाला. स्फोटामुळे इमारत कोसळून ९ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी भा.दं.वि. ३०४(१) अन्वये प्रशासनावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.