जळगाव : धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये मूत्ररोगासंबंधी तक्रारी वाढत आहेत. तक्रारीचे वेळीच निदान व उपचार व्हावा, यासाठी रोटरी क्लब जळगाव, मिडटाऊन, एस.के.चारिटेबल ट्रस्ट, पुणे व श्री हॉस्पिटल रिसर्च इन्स्टीट्यूट यांचे संयुक्त विद्यामाने जळगावातील (जेष्ठ नागरिकांसाठी, पुरुष व महिला दोघांसाठी ) मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी पुण्याचे आंतर्राष्ट्रीय प्रख्यातीचे मुत्ररोग तज्ञ डॉ. आर. के. शिंपी है या शिबिरात तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. आर. के. शिपी हे रुबी हॉल हॉस्पिटल पुणे येथे मुत्ररोग विभागाचे प्रमुख असून त्यांनी देश विदेशात जाऊन अनेक शिबीरात तपासणी व शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. सुरेंद्र सुरवाडे यांचे श्री हॉस्पिटल येथे गेली अनेक वर्षे हे शिबीर आयोजित केले जात असून आता पर्यंत शेकडो नागरिकांना यांचा लाभ घेतला आहे. रोटरी क्लब, मिडटाऊन यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न होत आहे.
सदर शिबीर दि. ४ व ५ नोव्हेंबर, शनिवार व रविवार रोजी श्री हॉस्पिटल, गिरणा टाकी जवळ, जळगांव येथे होत आहे. तपासणी मोफत असून यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सकाळीच १०.०० वा. येऊन शिबिरासाठी नोंदणी श्री हॉस्पिटल येथे करावी, दुपारी ३.०० वाजे पर्यंत शिबिराची वेळ आहे. या शिबीराचा फायदा जास्तकरुन ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे तरी त्यांनी य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.