नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आमदार किशोर पाटलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पाचोरा : येथील मुख्याधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी मंगेश देवरे सह विविध शाखेत कार्यरत अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी विविध भागातील रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न, पाणीपुरवठा, घनकचरा, लाईट, जन्म मृत्यूचे दाखले, या विषयावर अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे चित्र दिसून आले.

नागसेन नगर भागातील रस्ता, गाडगेबाबा नगर रस्ता, कोंडवाडा गल्ली राम मंदिर दोन्ही रस्त्याला रॅगिंग, तसेच शहरातील एकही रस्ता सुटणार नाही अशी तंबी देण्यात आली. जो पर्यंत काम पूर्ण होत नाही तो पर्यंत एक रुपयांचे बिल निघणार नाही असे सांगितले. ड्रेनेजची मागील पोझिशन संदर्भात आमदारांनी विचारणा केली असता मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा नवीन पाईपलाईन संदर्भात विचारले असता पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जितेंद्र मोरे यांनी 105 किमी पैकी 20 किमी पाईप लाईन चे काम झाले असून काम सुरू असल्याचे सांगितले तसेच आमदारांनी 105 किमी पाईप लाईन झाल्यावर पाण्याची पोझिशन काय राहणार असा ही प्रश्न उपस्थित केला.

घनकचरा विभागात किती कर्मचारी कार्यरत आहेत तेव्हा संबंधितांनी 123 कर्मचारी कार्यरत असून कार्यालयीन कर्मचारी वगळता 80 कर्मचारी हे घनकचऱ्याचे काम करीत असल्याचे सांगितले आमदारांनी नागरिकांच्या साफसफाई संदर्भात तक्रारी वाढत आहेत एका दिवसात गाव साफ झाले पाहिजे 80-85 कर्मचारी असतांना गटारीतून किडे बाहेर पडतात एक ही शॉपिंग कॉम्प्लेस मध्ये साफसफाई नाही टॉयलेट ची व्यवस्था नाही स्वच्छतेचा अभाव असल्याचे आमदार यांनी सांगितले वार्ड वाईज साफसफाई ची मोहीम राबवा असे ही सांगितले,कचरा हा डम्पिंग ग्राऊंडवरच गेला पाहिजे इतर ठिकाणी पडता कामा नये.अशा सूचना केल्या. सदरील प्रकार पाहता मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी लक्ष द्यावे अशा सूचनाहीआमदार किशोर पाटील यांनी केल्या आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,राजेश पाटील आदी उपस्थित होते.