traffic rules : वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक पोलिसांना आपली ओळख दाखवण्याचे काम अनेक जण करतात. मग राजकीय नेत्याची किंवा मोठ्या अधिकाऱ्याची ओळख दाखवून दंड भरण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आता हा फंडा चालणार नाही.
तुमची ओळख कमी येणार नाही. पोलीस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या वाहनांवर कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. यामुळे आता वाहतूक नियमांचे पालन करा, अन्यथा दंड भरुन द्या, हाच पर्याय वाहन धारकांपुढे असणार आहे.
हा नियम कुठे?
पुणे पोलीस या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे चालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या आधुनिक कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नियम मोडल्यानंतर वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात दहा शासकीय वाहनांमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्याद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वाहनांवर कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.