नागरिकांनो काळजी घ्या! जळगावात उद्यापासून उन्हाची तीव्रता वाढणार

जळगाव । जळगावसह राज्यात उष्णता वाढणार आहे. उद्या १५ मार्चपासून जळगावात तापमानाचा पारा वाढणार असून पुढील आठ दिवस पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यातील ढगाळ हवामानानंतर दिवसेंदिवस राज्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या दहा दिवसापूर्वी जळगावचा दिवसाचा पारा ३० अंश सेल्सिअसवर होता. यामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर रात्रीचा पारा देखील घसरल्याने उन्हाळ्यात थंडी जाणवत होती.

मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होताना दिसून आले. आता कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढला असून सध्या उन्हाचे चटके चांगलेच झोंबत आहेत. काल बुधवारी जळगावाचे दिवसाचे ३७ अंशापर्यंत नोंदविले गेले. आता उद्या १५ मार्चपासून जळगावात तापमानाचा पारा वाढणार आहे उद्यापासून पुढील आठ दिवस पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.