नागरिकांनो, लक्ष द्या! जीवितहानी टाळता येईल…

Lightning Alert App : वीजपासून बचाव करता यावा? यासाठी अनेकांनी मार्गदर्शन केले आहे. मात्र, आता तुम्हाला वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वीच याबाबत माहिती मिळणार आहे.

वीज पडून जीवीत हानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालय यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला वीज पडणार असल्यास त्याची माहिती तुम्हाला 15 मिनिटापूर्वी मिळून जाते. यामुळे आता तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाऊन जीवितहानी टाळता येणार आहे.

दामिनी ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून, वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या ॲपमध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे, तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. त्यामुळे हे ॲप सामान्य नागरिकांना  डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, याबाबतच्या सूचना जालना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.