नागरिकांनो, लक्ष द्या! विशेषतः ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी… काय सल्ला दिलाय?

नवी दिल्ली :  डिस्प्ले पिक्चर (डीपी) किंवा प्रोफाईल पिक्चर सोशल साईट्सवर वारंवार बदलल्याने तुम्ही सायबर क्राईमला बळी पडू शकता. जे वारंवार डीपी बदलतात त्यांना सायबर गुन्हेगार टार्गेट करू शकतात. सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी गोवा पोलिसांनी महिलांना वारंवार डीपी न बदलण्याचा सल्ला दिला आहे.

पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले की, सायबर क्राईमशी संबंधित दुष्ट लोक हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकरणांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.  याचे मुख्य कारण म्हणजे महिलांनी सोशल मीडियावर स्वत:ला असुरक्षित बनवणे आणि ब्लॅकमेलर्स आणि इतर गुन्हेगारांना बळी पडणे.

पोलिस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या, “जेव्हा आपण इंटरनेटवर असतो. फेसबुक. इंस्टाग्रामवर असतो तेव्हा आपण शक्य तितकी कमी छायाचित्रे अपलोड केली पाहिजेत आणि स्वतःला उघड करू नये. आपण आपला डीपी वारंवार बदलू नये. फसवणूक करणारे सर्व प्रथम अशा प्रकारच्या खात्यांचा वापर करतात. “यामुळे तुमची निंदा आणि छळही होऊ शकतो.  गोवा पोलिसांनी २०२२ मध्ये महिलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांचे ९० गुन्हे नोंदवले असून या वर्षात आतापर्यंत ५२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. जे 2021 मध्ये नोंदवलेल्या 38 प्रकरणांपेक्षा दुप्पट आहे.