मुलींच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकार, भारतीय डाक विभागांतर्गत विविध ठिकाणी टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत जळगाव डाक विभागात एकूण ६२ हजार ३०० खाते उघडण्यात आले आहेत.
जळगाव विभाग पोस्ट खात्यात विविध योजना राबविल्या जातात. त्यास अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या अभियानांतर्गत टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे ‘भविष्य उज्ज्वल बनविण्याची योजना कार्यरत आहे. मुलींच्या सुरक्षित आणि – उज्वल भवितव्यासाठी भारत सरकारद्वारा सुकन्या समृद्धी खाते योजना सुरू केली गेली आहे.
अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये
मुलगी जन्मल्यापासून १० वर्षापर्यंत सुकन्या खाते मुलीच्या नावावर उघडता येते. एका मुलीच्या नावे एकच खाते उघडू शकता. सदरील खाते उघडण्यासाठी मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक, फक्त २५० रुपये जमा करून सदरील खाते उघडता येते.
खाते उघडल्यापासून २१ वर्षापर्यंत एका आर्थिक वर्षामध्ये सरकारद्वारा वेळोवेळी निश्चित केलेल्या चक्रवाढ पद्धतीने व्याज देय असेल. १८ वर्ष पूर्णे केल्यानंतर किंवा इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, उच्चशिक्षण किंवा विवाह या कारणांसाठी ५० टक्के रक्कम काढता येते. खाते उघडल्यापासून २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केलेली रक्कम ही आयकर विभागाच्या ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.
सर्व टपाल कार्यालयात सुविधा
या योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची सोय सर्व टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
मुलगी दहा वर्षांची होण्याआधी काढावे लागते खाते
योजनेत लाभ घेण्यासाठी मुलगी जन्मल्यापासून १० वर्षापर्यंत तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते काढता येते.