---Advertisement---
Crime News : नाशिकमध्ये पुन्हा काल रात्री अनेक दुचाकी आणि चार चाकी गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, नाशिकच्या सिडको भागात काही दिवसांपूर्वी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
नाशिकच्या सिडको भागात काही दिवसांपूर्वी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. सिडको नंतर आता नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात काही युवकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्यरात्री युवकांनी कोयता मिरवत अनेक गाड्यांवर कोयता मारुन तोडफोट केली. रामकृष्ण हरी प्राईड बिल्डिंग मधील अनेक गाड्या जाळून त्यांचं नुकसान केलं. त्यामुळे नागरिकनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सदर प्रकार मागील काही दिवसांपासून घडत आहेत मात्र, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.