नाथाभाऊंचं भाजपात यायचं ठरलं.. पण लेकीची भूमिका काय? ; रोहिणी खडसेंच्या ट्विटनं भुवया उंचावल्या

जळगाव । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षापूर्वी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. सोबतच रोहिणी खडसे यादेखील प्रवेश करणार असल्याचे चर्चा होत्या. मात्र रोहिणी खडसे यांनी ट्विट करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. यामुळे

या ट्विटमध्ये रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला संघटनेचं अध्यक्षपद रोहिणी खडसे यांच्याकडे आहे. या पदावर राहत आपण काम करत राहणार असल्याचं रोहिणा खडसे म्हणाल्या आहेत.

रोहिणी खडसे यांचं ट्विट जसंच्या तसं
मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …