नायलॉन मांजा विकणाऱ्यांनो, सावधान; सहयोग सोशल ग्रुप…

 नंदुरबार : मकर संक्रांती सण अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपला आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. मात्र, नायलॉन व चायनीज मांजावर बंदी असूनहीं मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. परिणामी मांज्यात हानिकारकद्रव्यपदार्थ असल्याने मांजाच्या स्पर्श माणूस, पशु ,पक्षी, जखमी होऊन एखाद्याच्या प्राणावरही बेतु शकते, त्यामुळे होणारे गैरप्रकाराबाबत समाजात योग्य ती जनजागृती करण्याची मोहीम सहयोग सोशल ग्रुपतर्फे सुरू करण्यात आली आहे. तसेच याबाबत तळोदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, उपवनसंरक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन, ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष रमेश मगरे ,सचिव अशोक सूर्यवंशी,उपाध्यक्ष किर्तिकुमार शहा प्रवासी महासंघचे सचिव पंडित भामरे, सदस्य प्रा.राजाराम राणे, विनोद माळी, चेतन शर्मा आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.