मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत आज बुधवार, १४ रोजी खालावली. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली आहे.
काय म्हणाले राणे ?
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या ‘X’ वर पोस्ट करत “मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत ! “