‘नार-पार’च्या लढ्यात आता वैशाली सुर्यवंशी यांची ‘एंट्री’

पाचोरा : नार-पार प्रकल्पासाठी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पाठींबा देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली.

राज्य सरकारने नार-पार प्रकल्पाला मंजुरी देण्याचा आव आणला असला तरी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी आधीच हा प्रोजेक्ट रद्द केल्याची घोषणा करून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला विरोध म्हणून माजी खासदार उन्मेष पाटील यांनी कालपासून आज सायंकाळपर्यंत थेट गिरणा नदीच्या पात्रात आंदोलन सुरू केले. ते काल रात्रभर गिरणा नदीच्याच पात्रात उभे होते. तर आज सकाळपासून त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले.

शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी उन्मेष पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, वैशाली सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, संपदा पाटील, अभय पाटील, उध्दव मराठे आदी उपस्थित होते.