---Advertisement---

नाशिक पदवीधर निवडणूक निकाल : अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

---Advertisement---

पुणे: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचाच विजय होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यास आणखी बराच अवधी शिल्लक आहे. मतमोजणीच्या केवळ पहिल्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अंतिम निकाल येण्यापूर्वीच अजित पवार यांनी सत्यजीत तांबे हेच विजयी होतील, असे भाकीत वर्तविले आहे.

या निवडणुकीत सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मविआच्या उमेदवाराबाबत विश्वास दाखवण्याऐवजी अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांचा खात्रीशीर विजय होईल, असे म्हटले आहे. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment