नाशिक : पदवीधरचा पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून सत्यजित तांबे 7 हजार 922 मतांनी आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या काळामध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे या दोघांमध्ये हा सामना चुरस पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत पहिल्या फेरीचा निकाल हाती आलं असून त्यानुसार जवळपास ७ हजार ९२२ मतांनी शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या दीड तासांपासून जवळपास मतमोजणी सुरू आहे. अशा स्वरूपाची कांटे की टक्कर या दोघांमध्ये सुरू होती. मात्र आता पहिल्या फेरीची मतमोजणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून हळूहळू सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अंतिम चित्र बघायचं झालं तर सत्यजित तांबे हे सध्या आघाडीवर असून अद्याप अनेक फेऱ्या बाकी असल्याने शुभांगी पाटील किती झपाट्याने पुढे येतात, मतदारांनी त्यांना किती पसंती दिली, हे थोड्याच वेळात समोर येईल.
दरम्यान पहिल्या फेरीत 25 हजार मतांची मतमोजणी करण्यात आली. त्यानुसार सत्यजित तांबे 15 हजार 784, शुभांगी भास्कर पाटील 7 हजार 862, रचन कचरू बनसोडे 560, सुरेश भीमराव पवार 225, अनिल शांताराम तेजा 28, अन्सारी राईस अहमद अब्दुल कादिल 51, अविनाश महादू माळी 268, इरफान इखलाख 18, ईश्वर उखा पाटील 45, बाळासाहेब रामनाथ घोरपडे 142, ऍड. जुबेर नासिर शेख 54, ऍड. सुभाष राजाराम जंगले 46, नितीन नारायण सरोदे 63, पोपट सिताराम बनकर 24, सुभाष निवृत्ती शिंदे 46, संजय एकनाथ माळी 42 मते पडली आहेत.