रावेर : नाशिक विभागाचे विभागीय राधाकृष्ण गमे यांनी प्रसिद्ध थंड हवेचे पाल गारबर्डी जवळील वनक्षेत्रात पाहणी केली. या क्षेत्रात पर्यटन प्रेमीसाठी जंगल सफारी सुरु होत असून त्याची प्रत्यक्ष जंगल सफारी गमे यांनी करून पाल येथील अनुपम विश्रामगृहाची पहाणी करत आढवा घेतला.
नासिक विभागाचे आयूक्त राधाकृष्ण गमे यानीं पाल परिसरात सातपूडा जगंल सफारी केली. यावेळी सहायक विभागिय आयूक्त विठ्ठल सोनवणे, रावेर प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजय बावणे ,सह वनपाल, वनरक्षक उपस्थीत होते. सकाळी झालेल्या जगंल सफारीत अस्वल, ससा, मोर, रानडूक्कर, बिबट्याच्या पायाचे ठसे आयूक्तानां दिसले. सातपूडा जगंल सफारी गारबर्डी रोपवाटीकेपासून सूरू होते. यात सूकी धरण, मचान, त्रिवेणी धबदबा, अवणी सरंक्षणकूटी, माकडदरी धबदबा या परिसराचा समावेश प्रादेशिक वनविभागाने केला आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जंगल सफारी करताना वनक्षेत्रपाल बावणे यांच्याकडून प्राण्यांविषयी माहिती घेतली.या २४ किलोमीटर अतंरात आतापर्यंत बिबट, अस्वल, मोर, रानडूक्कर, निलगाय, सांबर, चिकांरा, हरिण, सर्पगरूड, अजगर, तडस, कोल्हा, लाडंगा या प्राण्याचीं नोदं वनविभागाने केली आहे.
एप्रिल महिन्यात सुरू होईल जंगल सफारी
सातपूडा पाल जगंल सफारी सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यासाठी प्रादेशिक वनविभागाने स्थानिक वनमजूरानां प्रशिक्षण दिले आहेत.३१ मार्च नतंर साधारणतः एप्रिल महिन्यात सातपूडा पाल जगंल सफारी हि सामान्य जनतेसाठी खूले करण्यात येईल .
– अजय बावणे, वनक्षेत्रपाल
ब्रिटिशकालीन अनूपम विश्रामगृह देखरेख चांगली
ब्रिटिश काळातील पाल वनविभागाच्या आवारात अनूपम बगंला आहे. वनविभाग अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांनी या अनूपम विश्राम गृह देखरेख व्यवस्थित राखल्याने नासिक विभागिय आयूक्त यानी दाद दिली.