नाश्त्यासाठी बनवा चटपटीत पनीर पराठा

 तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। सकाळी नाश्ता करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असत. पण नाश्त्याला आपण पोहे, उपमा असे काही बनवतो पण याव्यतिरिक्त सुद्धा काही वेगळा नाश्ता हवा मग अशावेळी वेगळं काय करावं हा प्रश्न पडतो. तर नाश्त्याला वेगळं काहीतरी असं पनीर पराठा तुम्ही बनवू शकता. तर पनीर पराठा घरी कसा बनवावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
गव्हाचे पीठ, किसलेले पनीर, किसलेले उकडलेले बटाटे, आले किसलेले, हिरवी मिरची, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हिरवी कोथिंबीर, आमचूर पावडर, बटर, मीठ.

कृती
सर्वप्रथम,गव्हाचे पीठ चाळून घ्या, त्यामध्ये थोडे तेल, मीठ घाला आणि थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठाला थोडे तेल लावून २०-२५ मिनिटे कापडाने झाकून ठेवा. आता एक मध्यम आकाराचे मिक्सिंग बाऊल घ्या, त्यात किसलेले पनीर आणि किसलेला बटाटा घालून दोन्ही चांगले मॅश करा. आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, आले, हिरवी धणे, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट घालून हे सर्व मिश्रण एकजीव  करून घ्या.

यानंतर मसाल्यामध्ये पुदिन्याची पाने आणि कैरीची पूड घालून चवीनुसार मीठ मिक्स करून पराठ्यासाठी मसाला तयार करा. यानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि त्यातून गोळे बनवा. आता कढई मध्यम आचेवर गरम करा आणि पिठाचे गोळे पुरीच्या आकारात लाटून त्यात पनीरचे तयार सारण भरा आणि कडा मध्यभागी आणून स्टफिंग बंद करा.

त्यानंतर त्याला वर्तुळाचा आकार द्या. आता हा गोळा हलका दाबून पराठा गोलाकार आकारात लाटून घ्या. यानंतर तव्यावर थोडं तेल टाकून ते भोवती पसरवून पराठा टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या. थोड्या वेळाने पराठा पलटून त्यावर तेल लावा. पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा. तयार आहे पनीर पराठा.