‘नाहीतर अहिराणीमध्ये घाण-घाण शिव्या दिल्या असत्या…’, राऊत गरजल्यावर पाटीलही बरसले

जळगाव : जळगाव जिल्हा हा बहिणाबाई चौधरी यांचा जिल्हा आहे. काल माझे आवडते मित्र आणि खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेले आणि जेव्हा ते इथं येतात जेव्हा त्यांना माझ्यावर बोलल्याशिवाय आनंद होत नाही, असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय रातांवर टीका केली.

खरं म्हणायला गेले तर महिला इकडे बसल्या आहेत, नाहीतर अहिराणीमध्ये इतक्या घाण घाण शिव्या दिल्या असत्या. त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती. सांगायचा अर्थ असा आहे की, हा खान्देश आहे इथं येऊन ते काय बोलून गेले. ज्या पक्षाबरोबर आपण ३०-३५ वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडखाऊ म्हणतात. ही तुमची संस्कृती, ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हला शिकवलय. गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले. त्यांना माहिती नाय ही चार लोक काय काम करतात, असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय रातांवर टीका केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे उमदेवार पाच लाखांच्या लीढणे जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी नशीब पन्नास लाख बोलले नाही. असे म्हणत टीका केली होती. तसेच गुलाबराव पाटील यांच्यावर देखील केस नसलेला टकल्या म्हणत टीका केली होती.