ना लेखी परीक्षा ना मुलाखत! रेल्वेत 1104 जागांवर थेट भरती, 10वी+ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..

उत्तर पूर्व रेल्वेत काही रिक्त पदावर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना येथे मोठी संधी असणार आहे.

विशेष म्हणजेच या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार नाही. ही भरती 10वी आणि ITI अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल

या भरतीद्वारे एकूण 1104 जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया 3 जुलैपासून सुरू झाली असून  अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे. इच्छुक उमेदवार rrcgorakhpur.net ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

पदे आणि रिक्त जागांचे तपशील
यांत्रिक कार्यशाळा/ गोरखपूर – 411
सिग्नल वर्कशॉप / गोरखपूर कॅन्ट – 63
ब्रिज वर्कशॉप/ गोरखपूर कॅन्ट – 35
यांत्रिक कार्यशाळा/ इज्जतनगर – ६०
डिझेल शेड/इज्जतनगर – ६०
कॅरेज आणि वॅगन / इज्जतनगर – 64
कॅरेज आणि वॅगन / लखनौ – 155
डिझेल शेड/ गोंडा -90
कॅरेज आणि वॅगन / वाराणसी – 75
एकूण – 1104

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर)
वयाची अट: 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क :  ₹100/- (एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.)

नोकरी ठिकाण: गोरखपूर

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online