नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहाल टीका

मुंबई : ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात आला आहे. मात्र, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी याबद्दल प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “ही वाखनखे परतावा आहेत का?”, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे. अफझलखानाचे वंशजच शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करू शकतात. असं राणे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे खरंच बाळासाहेबांचे नातू आहे का? पुरावे मागितले तर चालतील का? असा सवाल राणेंनी केला. आमच्यासारख्या मावळ्यांना ही वाघनखं चांगल्या प्रकारे वापरता येतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.