नितेश राणेंनी केले मोहोळे कुटुंबियांचे सांत्वन

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. दरम्यान, रविवारी शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता नितेश राणेंनी स्वत: मोहोळ यांच्या कुटुंबियांची सोमवारी भेट घेतली आहे.
५ जानेवारी रोजी शरद मोहोळ यांच्या साथीदारांनीच त्यांना खून केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून अद्याप तपास सुरु आहे. मोहोळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद मोहोळ यांच्या पत्नींना आधार देण्यासाठी आणि हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं, अशी विनंती करण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच हिंदुत्त्ववादी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संकटात खचून जाऊ नये. आम्ही सगळे परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. या कुटुंबाने हिंदु समाजासाठी काम केलं आहे. हिंदु समाजावर कुठलंही संकट आलं तर हे कुटुंब स्वत: उभ राहिलेलं आहे. त्यामुळे या संकटकाळात त्यांना सांत्वना देण्यासाठी नितेश राणेंनी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली.