निर्दयीपणे कोंबून चालविल्या होत्या ५३ म्हशी; पोलिसांनी ‘अशी’ केली सुटका

जळगाव : बेकायदेशीरित्या, विनापरवाना तीन वाहनांमध्ये निर्दयीपणे ५३ म्हशी कोंबून घेऊन जाणारी वाहने पकडण्यात आले. ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता नशिराबाद गावानजीक राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा येथे केली आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून म्हशी, वाहने असा एकूण ३६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बेकायदेशीररित्या व विनापरवाना तीन वाहनांमधून गुरांची वाहतूक सुरू असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता नशिराबाद पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर तिनही वाहनाची तपासणी केली असता त्यात म्हशींसाठी खाली कोणतेही गादी टाकलेली नव्हती व पशू वैद्यकीय अधिकाऱ्याचे कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. दोन वाहनांमधून प्रत्येकी १८ व एका वाहनातून १७ म्हशींची निर्दयीपणे वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी तीनही वाहने व म्हशी असा एकुण ३६ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ अतुल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायन खान कलीम खान (२८, रा. बलखड, जि. खरगोन, मध्यप्रदेश), साहीद खान सलीम खान (३५, रा. बालासमट, जि. खरगोन, मध्यप्रदेश), समीर शहा सिद्धीक शहा (२९, रा. देवास, इंदूर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हरेष पाटील करीत आहेत.