निवडणुकांमध्ये तुमची जिरवायला आम्ही सज्ज आहोत. असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसुन आले. तर, ठाकरे गटाची पिछेहाट झाली. यावर खासदार संजय राऊतांनी ट्विट करत निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले, “ज्यांनी एक साधी सरपंच निवडणूक लढवली नाही.. तो असाच YZ सारखाच बोलणार..ग्रामपंचाय मधे सरपंच पदाचे उमेदवार हे राजकीय पक्ष ठरवतात..गावाला विश्वासात घेऊन.. तुमचे पुढून १ नंबर आले असते तर हेच तून तुने वाजवले असते का?? मागून पाहिले येऊन..शेंबुड पुसत बसायचे नाही.. आणि पहिले स्वतःच्या पक्षाच्या कोर्टात याचिका मागे घेयाला सांग.. मग निवडणुकां मधे तुमची जिरवायला आम्ही सज्ज आहोत ! लक्षात असून दे !” असा इशाराच राणेंनी दिला आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले राऊत ?
“काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे. जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते.ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”