निवडणुकीच्या काळातही डिझेलचा वापर वाढत नाहीय, हे आहे कारण

देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच निवडणुकीच्या हालचालींना वेग आला होता. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतरही एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत डिझेलच्या वापरात मोठी घट झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात देशात पेट्रोलचा वापर सात टक्क्यांनी वाढला आहे.

याउलट डिझेलच्या विक्रीत ९.५ टक्के घट झाली आहे. कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल विक्रीबाबत परस्परविरोधी आकडेवारी समोर आली आहे. तीन सरकारी पेट्रोलियम कंपन्यांचे ९० टक्के इंधन बाजारावर नियंत्रण आहे.