निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार !

देशात सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण आहे. अनेक राजकीय पक्ष एकापाठोपाठ एक आश्वासने देत आहेत, तर वेगवेगळे अहवाल निवडणुकीनंतर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा वाढू शकतात, असे सांगत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता एका अहवालात म्हटले आहे की निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती 15 ते 17 टक्क्यांनी वाढू शकतात.

देशात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. यानंतर 1 जूनपर्यंत सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन नवीन सरकार स्थापन होईल. निवडणुकीनंतर टेलिकॉम उद्योग शुल्क वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.