निवडणुकी तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का ! विश्वासू नेता करणार आज भाजपमध्ये प्रवेश

मुंबई । शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नसून अशातच ऐन लोकसभा निवडणूक काळात ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू नेता भाजपमध्ये प्रवेश आज प्रवेश करणार आहे. मात्र हा बडा नेता कोण याबाबतची स्पष्टता आलेली नाही. या नेत्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

दरम्यान, देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय असून लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. परंतु ठाकरे गटाची गळती थांबत नाहीय.

ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा बडा नेता कोण? या नेत्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आज सकाळी ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.आज सकाळी भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. हा नेते नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

काँग्रेसचे नेते, पंजाबचे माजी राज्यापाल, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात घडत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.