निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी जारी केली अधिसूचना, 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज सुरू

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवार, 20 मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. आजपासून निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे, तर निकाल ४ जूनला लागणार आहेत.